अमृत महोत्सवनिमित्त आविष्कार कॉलनी रहिवाशांकडून ७७ वा स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा.

धुळे (अनिस खाटीक) धुळे येथील ४० गांव रोड परिसरात असलेल्या अविष्कार कॉलनी येथे शहिद सऊद पटेल उद्यान मध्ये भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त ७७ वा स्वतंत्रदिवस साजरा करण्यात आला. या

कार्यक्रमाचे अध्यक्ष फखरुद्दीन लोहार होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन मुफ्ती मोहम्मद कासिम जिलानी, अनिस शाह, बब्लु खाटीक, नुरुद्दीक शेख, नहाकर सर, डॉ.जाविद, आमिन मिर्झा, अन्वर ठेकेदार, हुसेन दादा, रईस पटेल, मुख्तार पठाण, युनुस दादा, शोएब खान,हवालदार इत्यादी उपस्थित होते. हया कार्यक्रमाच्या सुरुवातीस मौलवी अशफाक पटेल यांनी नात शरीफ चे पठन करुन उपस्थित रसीका समोर राष्ट्रीय तराना सादर करुन भरपूर दादा मिळविली. या नंतर मुफती कासिम जिलानी यांच्या हस्ते भारतीय तिरंगा झेंडा फडकवुन राष्ट्रगीत सांगुन झेंडयाला सलामी देण्यात आली. मुफती कासिम जिलानी तसेच इतर मान्यवरांनी स्वातंत्रता पर आपापले मनोगत व्यक्त केले. सुत्र संचालन चे काम अनिस शाह यांनी पाहिले या कार्यक्रमामध्ये उपस्थितांनी एकतेची शपथ घेतली. कार्यक्रमात शेवटी उपस्थितांना चहा पाणी व पेढे वाटुन स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा ही देण्यात आल्या. फखरुद्दीन लोहार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रम समारोप केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाविद टंकर, जाविद मंसुरी, जुबेर बेग, अजहर बेग, साबिर मन्सुरी, शब्बीर मन्सुरी, वसिम शेख, हमीद शेख इत्यादींनी परिश्रम घेतले.