आईच्या स्मरणार्थ कब्रस्थानात शंभर वृक्ष लागवडसह ठिबक सिंचन.
-एरंडोलला कवी, इंजि. जाकीर सैय्यद यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतूक..

एरंडोल( प्रतिनिधि )येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कवी, साहित्यिक, इंजि. जाकीर सैय्यद यांनी आईच्या स्मरणार्थ चहैलूम (कारण) न करता कब्रस्थानात शंभर वृक्ष लागवड करून वृक्ष जगविण्यासाठी ठिबक सिंचनाची देखील व्यवस्था केल्याने सामाजिक आदर्श निर्माण केल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.
दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सैय्यद वाड्यातील रहिवासी जाकीर सैय्यद यांच्या मातोश्री मेहेरबानो (वय 80 वर्षे) यांचे वृध्दापकाळाने 8 जुलै 2023 रोजी दु:खद निधन झाले होते. दि. 15 ऑगस्ट 2023 त्यांच्या 40 दिवसांचा कार्यक्रम न करता आईच्या स्मरणार्थ कब्रस्थानात 100 विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून कुराण पठण करण्यात आले. तसेच वृक्ष जगविण्यासाठी ठिबक सिंचनाची देखील व्यवस्था करण्यात आल्याने समाजात चांगल्या उपक्रमांचे कौतूक करण्यात येवून कब्रस्थान हिरवागार होवू शकणार आहे.
सदरप्रसंगी कब्रस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शकीलोद्दीन सर, चिटणीस जाकीर अली सैय्यद, माजी नगरसेवक एजाज अहमद यांचेसह उर्दू हायस्कूल संस्था अध्यक्ष जहिरोद्दीन शेठ आदींनी वृक्षारोपण केले. मृतात्म्यास शांती लाभो ही प्रार्थना –