आमदार मा.चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नाने विकास कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी..

एरंडोल ( प्रतिनिधि ) आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांतुन नुकताच एरंडोल शहराचा विविध विकासकामांसाठी ५ कोटी रूपयांचा निधीला मंजुर मिळाली. त्यात कुंभार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधकामासाठी १५ लक्ष रूपये निधी देण्यात आला. त्याचअनुषंगाने कुंभार समाजासारख्या छोट्या समाजाला मागणी नसतांनाही प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा भुमिकेतुन आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांनी आम्हाला समाजासाठी सभागृहाच्या रूपाने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांचा समस्त एरंडोल तालुका कुंभार समाजाच्या वतीने आज सत्कार करत आभार प्रकट केले.