अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर क्राइम व वनकायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल. -वनरक्षक वनविभाग.

0

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथे दोन ठिकाणी बिबट्या दिसल्याची अफवा पसरवून नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीती पसरवली जात आहे. त्यामुळे अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर क्राइम व वनकायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा सहायक वनसंरक्षक सुदर्शन शिसव यांनी दिला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून अमळनेर तालुक्यातील मुडी बोदर्डे येथे व शहरात रुबजी नगर(शाह आलम नगर)भागात बिबट्या दिसल्याची अफवा सोशल मीडियावर काही समाजकंटक पसरवत आहेत.

इंटरनेट अथवा फोटोशॉपच्या माध्यमातून बिबट्याच्या अशा खोट्या पोस्ट तयार करून या भागात बिबट्या दिसला त्या भागात दिसला अशीखोटी अफवा पसरवली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काही ठिकाणी नागरिक भीतीने रात्रभर जागे राहिले. वनविभागाने अशा घटनांचा तपास केला असता कुठेही प्राण्याची छबी किंवा संचार दिसून आलेले नाही.
त्यामुळे निव्वळ वनविभागाची दिशाभूल करणे अथवा अफवा पसरवण्याचा हा प्रकार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.तरी कोणीही अफवा पसरवू नये अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!