मंत्री अनिल पाटील यांच्यावर जळगाव,धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्याची जबाबदारी.

24 प्राईम न्यूज 19 Aug 2023 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आता पक्ष संघटनावाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्ह्यांची पक्ष संघटनावाढीकरिता जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोपवली आहे.तसेच पक्ष संघटनवाढीसाठी मंत्री अनिल पाटील यांच्यावर जळगाव,धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे आगामी वर्ष हे निवडणुकांचे
असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेचा फायदा पक्ष संघटनावाढीसाठी व्हावा, यादृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश कार्यकर्ते आपल्याकडे वळविणे आणि नवीन कार्यकर्ते तयार करण्याचे आव्हान
अजितदादांसमोर असणार आहे. त्यादृष्टीनेच ही तयारी सुरू झाली आहे.