जळगाव येथील राजमल लखीचंद ज्वेलर्सची ईडीकडून चौकशी..

जळगाव( प्रतिनिधी) सोन्यासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या राजमल लखीचंद (आर. एल.) या फर्मच्या जळगावच्या मुख्य कार्यालयावर गुरुवारी पहाटे ईडी (सक्तवसुली संचालनालय) पथकाने तपासणी केल्याचे वृत्त आहे. ‘ईडी’च्या २० ते २५ अधिकाऱ्यांच्या पथकाने १५ ते १८ तास ही तपासणी केली. संचालक माजी आमदार मनीष जैन यांनी या तपासणीबाबत मौन बाळगले आहे. गुरुवारी पहाटे चार वाजता ईडीचे अधिकारी दाखल झाले. पाठोपाठ औरंगाबाद, नाशिक येथून आलेले पथक सहभागी झाले. सकाळी तपासणीस सुरुवात झाली. आत कुणालाही प्रवेश नव्हता. दिवसभर ग्राहकांसाठी फर्म बंद होती. राजमल लखीचंदच्या विविध आस्थापनांची इंडीच्या नागपूर कार्यालयाकडून तपासणी केल्याचे समजते.