राहुल गांधी, गांधी घराण्याचा पारमपरिक अमेठी मतदार संघातून लढणार..

24 प्राईम न्यूज 19 Aug 2023
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे अमेठीतून निवडणूक लढणार आहेत, अशी घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केली, तर प्रियंका वढेरा या कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे राय यांनी स्पष्ट केले. २०१९ च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीतून विजय मिळवला होता. त्यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. अमेठी हा
गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून संजय गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी निवडून गेल्या आहेत.