सुब्रतो चषक फुटबॉल १७ वर्षाखालील मुलांमध्ये नागपूर व कोल्हापूर अंतिम फेरीत दाखल..
–दोन्ही संघ पेनल्टी मध्ये पात्र
–स्टेफौन परेरा यास उत्कृष्ट खेळाडूचे दोन सुवर्ण पदके..

जळगाव ( प्रतिनिधी ) श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरू असलेल्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक राज्यस्तरीय आंतरशालेय स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांमध्ये
नागपूर व कोल्हापूर संघाने अंतिम फेरीत मजल मारली असून रविवारी सकाळी १० वाजता अंतिम सामना खेळला जाईल तर थर्ड प्लेस साठी सकाळी ९ वाजता नाशिक विरुद्ध पुणे या संघात सामना होणार आहे.
उपांत्य फेरीचे दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे
उपांत्य फेरी से दोन्ही सामने बरोबरीत सूटल्याने पेनल्टी मध्ये नागपूर च्या गोलकीपर अनिमेश सोरेन याने जीवाची पराकाष्ठा करीत भर पाऊसात गोल वाचवित आपल्या संघाला विजयी श्री खेचून आणली त्यालाच उत्कृष्ट खेळाडू चा पुरस्कार व फारुक शेख यांनी रोख बक्षीस देऊन त्याचा गौरव केला.
दुसरा उपांत्य फेरीचा सामना कोल्हापूर विरुद्ध पुणे यात झाला २-२ ने सामना संपला नंतर पेनल्टी मध्ये कोल्हापूर ने ५-३ ने हा सामना जिंकला.
उद्घाटन समारंभ
या स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या रेहाना अन्सारी फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक यांच्या हस्ते तर जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण व फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
गोवान सिंग (नाशिक), शाफे खान (औरंगाबाद) आकाश हसदा (नागपूर) स्टेफॉन परेरा (पुणे) दोन वेळेला, अनिमेश सोरेन (नागपूर),
पुरस्कार व स्पर्धेचे नाणेफेक हस्ते
डी एस ओ गुरुदत्त चव्हाण, डॉ तहेरीन सना (अकोला) रेहाना अन्सारी (मुंबई) फारुख शेख, विल्सन ( पुणे), अरबाज खान (जळगाव) आशुतोष शुक्ला (मुंबई), अद्व्होकेट आमीर शेख, साबीर शेख (नशिराबाद), मनोज सुरवाडे, यांच्या हस्ते करण्यात आले.
सामन्यांचा निकाल
- नाशिक वि वि मुंबई २-१
*कोल्हापूर वी वी औरंगाबाद ८-० - नागपूर विवी अमरावती १-०
- पुणे वी वी लातूर ३-०
- नागपूर वी वी नाशिक २-१
*पुणे विवी कोल्हापूर २-२ ( पेनल्टी ५-३)