शहीद हुतात्म्यांना अभिवादन करत नवीन स्मारकाचे अनावरण..

अमळनेर (प्रतिनिधि) इंग्रज अधिकाऱ्यांच्या गोळीबारात शहिद झालेल्या नऊ कामगारांच्या समरणार्थ राणी लक्ष्मीबाई चौकात नगरपालिकेतर्फे नूतनीकरण करण्यात आलेल्या लाल बावटा हुतात्मा स्मारकाचे अनावरण माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
२७ ऑगस्ट १९४७ रोजी कॉ श्रीपत श्रावण पाटील , कॉ गंगाधर भिला बोरसे , कॉ मोकल झुमकिराम ,कॉ रतन हरी ,कॉ शंकर मोतीराम , कॉ सोनू रंगा चांभार , कॉ शंकर धोंडिबा , कॉ श्रीपत भिला , कॉ बन्सी जीवन कोळी या नऊ कामगारांनी राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन केले. त्यांच्यावर तत्कालीन इंग्रज अधिकारी डेव्हिड यांनी गोळीबार केल्याने ते कामगार शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्या चौकात लाल बावटा हुतात्मा स्मारक उभारण्यात आले होते. मात्र ते अतिशय लहान असल्याने ‛मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी नव्याने स्मारक उभारून हुतात्म्यांना अभिवादन केले. या स्मारकाचे अनावरण माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचप्राण शपथ घेण्यात आली. कार्यक्रमास संजय चौधरी ,शिवाजी पाटील ,कॉ लक्ष्मण शिंदे , रियाज मौलाना , इम्रान खाटीक, दिगंबर वाघ , राजेंद्र पाटील ,विमलबाई शिंदे हजर होते.