महीलेला फसविणा-या भोंदु बाबाच्या मुसक्या आवळल्या. -देवपुर पोलीसांची धडक कारवाई..

धुळे ( अनिस खाटीक) फिर्यादी महीला नामे सौ किरण जडे व साक्षीदार व तीचे पती आणी मुलगा असे घरात असतांना दि. २९.०६.२०२३ रोजी सकाळी १०.३० वा सु. आरोपी अनोळखी भोंदु बाबा साधुच्या रूपात भिक्षा मागण्यासाठी व भविष्य सांगण्याचा बहाण्याने त्याचे कडील काळया रंगाची पल्सर मोटार सायकल क्रमांक एम एच १९. डी. टी. ०८९५ हीच्याने फिर्यादी कडे आला व फिर्यादीने भविष्य बघण्यासाठी घरात बोलाविले व पाणी दिले तेव्हा आरोपीने फिर्यादी व तीचे पती यांना सांगीतले की तुमचे सर्व चांगले करतो असे सांगुन हात चालाकी करुन हातात कुंकु व तांदुळ घेवुन त्याची विभुती राख करून दाखविले नंतर मंत्र उच्चार करुन महादेवाची छोटी पिंड प्रकट करुन दाखविली व तुमच्या कडुन मला काहीच नको मी सोन्याची पुजा करून मंत्र मारुन तुमची परीक्षा घ्यायाला आलो आहे असे सांगुन तुमच्या अंगावरील सोने दया सोबत नेणार नाही व संध्याकाळी जेवणासाठी तुमच्या घरी येतो व सोन्याची पुजा करुन मंत्र मारुन परत देतो व तुम्ही ते सोन परीधान केल्यावर तुमचे सगळे कल्याण होइल व सुखी राहाल असे सांगुन विश्वास संपादन करुन फिर्यादीने भोंदु बाबाच्या सांगणप्रमाणे त्यांचे कडील सोन्याचे तीन ग्रॅम वजनाचे कानातले टाप्स व ६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असा एकुण १८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने काढून सदर भोंदु बाबाच्या ताब्यात दिले व वरील दागीने घेवुन सदर भोंदु बाबा फरार झाला संध्याकाळी जेवणासाठी वाट बघितली परंतु तो आलाच नाही त्याचे नाव गाव पत्ता माहीत नव्हते आपली फसवणुक झाली असे फिर्यादीच्या लक्षात आल्याने त्यांनी लागलीच देवपुर पोलीस स्टेशनला येवुन वरील हकीकत सांगीतली.
देवपुर पोलीस स्टेशन येथे अनोळखी आरोपी विरुध्द देवपुर पोस्टे भाग-५ गुरन २२६ / २०२३ भादवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे तसेच सदर भोंदु बाबाची माहीती काढुन आजु बाजुच्या सीसीटीव्ही फुटेजच्या सहायाने सदर भोंदुबाबाचे फोटो संपादन करुन त्याचा तपास करीत असतांना तो बिलाडी रोड वरील एकता नगर परीसरात त्याचे काळया रंगाची पल्सर मोटार सायकल क्रमांक एम एच १९ डी. टी. ०८९५ हीचे वर बसुन फिरत असल्याची माहीती मिळाल्याने शोध पथकाचे कर्मचा-यांनी त्यास तात्काळ ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिली असुन त्याने त्याचे नाव नारायण किसन चव्हाण वय ३५ धंदा भविष्या सांगणे रा. . झ खुर्द ता. जामनेर जि. जळगांव असे सांगीतले असुन त्याचा कडुन त्याचे मोटारसायकलच्या शिट खाली ठेवलेले वरील दागीने त्याने काढुन दिले असुन त्याचे कडुन एकुण मोटारसायकल सह एकुण ६८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे..
सदरची कामगिरी मा, पोलिस अधिक्षक श्री संजय बारकुंड सो, मा, अप्पर पोलिस अधिक्षक किशोर काळे सो, व मा, सहायक पोलिस अधिक्षक त्रषिकेश रेड्डी सो. यांचे मार्गदर्शनाखाली देवपुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतिष घोटेकर, पोसइ राजेश इंदवे व शोध पथकाचे असइ / मिलींद सोनवणे, पोहेका/पंकज चव्हाण, पोका / किरण सावळे, पोका / सागर थाटशिंगारे पोका /सौरभ कुटे व तपासी अंमलदार पोना / विश्वनाथ शिरसाठ यांनी सदरची कार्यवाही केली