अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दगडु पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या महाराष्ट्र राज्य सह समन्वयक पदी निवड….

0

अमळनेर(प्रतिनिधि)

आगामी वर्ष हे संपूर्ण भारतात निवडणूकांचे वर्ष असणार आहे त्यात लोकसभा, अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका असणार आहेत त्यामुळेच काँग्रेस पक्ष त्यातच युवक काँग्रेस सक्रियपणे निवडणूक मोडवर आली असून सर्व युवकांना जबाबदाऱ्या सुपूर्द करण्यात येत आहेत. त्यातच अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दगडु पाटील यांची सोशल मीडियामधील कामगिरीचा आढावा घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडिया विभागात राज्य सह समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली . लोकसभा व विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई आणि बेरोजगारी सारख्या गंभीर विषयांवर तसेच भाजप सरकारच्या सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या धोरणांविरोधात जनजागृती करण्यासाठी युवक काँग्रेस मोर्चेबांधणी करीत आहे त्यासाठी विभागनिहाय समन्वयकांच्या देखील नियुक्तया करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत ,भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मिडीया विभागाच्या प्रभारी झीनत शबरीन, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली “वाॅर रूम” महिन्याभरात सुरू करण्यात येणार आहेत. युवक काँग्रेस सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या चूकीच्या जूलमी धोरणांविरोधात लढा देणार आहे तसेच सामान्यांपर्यंत सत्य परिस्थिती मांडण्याचे कार्य करणार आहे.
दरम्यान महेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, माजी नगरसेवक तथा अर्बन बँक माजी चेअरमन विद्यमान संचालक प्रविण पाटील, नगरसेवक शाम पाटील, नगरसेविका कमलबाई पाटील,जेष्ठ नेते प्रा बी के सुर्यवंशी, जेष्ठ नेते संदीप घोरपडे, समाजसेवक रवि पाटील, काँग्रेस युवा नेते आशुतोष पवार , राजु शेख, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष तुषार संदानशिव, युवक काँग्रेस प्रदेश सचिव किरण पाटील, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रा हितेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंबादास गोसावी , जिल्हासचिव करूण सुर्वे , चोपडा युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे , चाळीसगाव युवक काँग्रेस अध्यक्ष प्रज्वल राजपुत , राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्याक नेते सईद तेली ,ओ बी सी सेल तालुकाध्यक्ष मनोज बोरसे , अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष जुबेर पठाण, युवक काँग्रेस शहराध्यक्ष तौसिफ तेली, राजु भाट तसेच काँग्रेस पक्षातील जेष्ठ पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करत कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!