80 फुटी रोड ते नंदी रोड पर्यंतच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ. आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न

0

धुळे ( अनीस खाटीक )
धुळे शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत 80 फुटी रोड ते नंदी रोड पर्यंतच्या कामाचे 50 लाख रुपये कामाचे शुभारंभ आ.फारुख शाह

यांचे हस्ते करण्यात आले यावेळी आ.फारुख शाह यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की शहरातील मूलभूत सुविधा व विकास करण्याचे ध्येय आम्ही घेतले असून शहरातील रस्ते गटारी व पाणीचे पाईपलाईन शहराच्या विविध भागात करण्यास आम्ही बांधील आहोत.तसेच शहरातील बेरोजगारी दूर करण्यासाठी एमआयडीसी भागात जमीन अधिग्रहण करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जात आहे आज पर्यंत शहराच्या विकासासाठी कोणत्या आमदारांनी जितका निधी मूलभूत सुविधांसाठी आणला नसेल तितका निधी त्यापेक्षा शेकडो कोटीचा निधी शहराचा विकासासाठी आम्ही आणला आहे शहराच्या विकासाच्या खोट्या वल्गना करण्यापेक्षा प्रत्यक्ष शासनाकडून निधी आणण्याचे काम आम्ही केले आहे शहराच्या नागरिकांच्या कामासाठी निवेदन आल्याबरोबर प्रत्यक्ष त्या कामाबाबत पाठपुरावा करून काम करून देणे हेच माझे मी कर्तव्य समजतो असे प्रतिपादन आ.फारुख शाह यांनी धुळे शहरातील 80 कोटी रोड पासून ते नंदी रोड पर्यंतच्या 50 लाख रुपये कामाच्या कामाच्या शुभारंभ करतेवेळी केले यावेळी या भागातील नागरिकांनी आ.फारुख शाह यांच्या मोठ्या प्रमाणात सत्कार केला व आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की सुमारे पन्नास वर्षापासून असलेल्या या वस्तीला आजपर्यंत रोड न होता परंतु आ.फारुख शाह यांच्याकडे निवेदन दिल्याबरोबर आ.फारुख शाहयांनी आमचे काम सहा महिन्यात करून दिले याबद्दल तिथल्या नागरिकांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला या भागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.आ.फारुख शाह यांचेसोबत नगरसेवक युसुफ मुल्ला नगरसेवक मुक्तार अन्सारी,नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक आमिर पठाण, गुफरान पोपटवाले, असलम अन्सारी, जाकिर अन्सारी, प्यारेलाल पिंजारी,निजाम सैय्यद,मौलवी शकील,सुलेमान मलिक,सुफी हाजी,जमील खाटीक,आसिफ शाह,जावेद मिर्झा,सउद सरदार,हलीम शमसुद्दिन,माजीद पठाण,जैद अन्सारी, जिड्ड्या पहिलवान,सिराज मलिक,छोटू खाटीक,अकबर शेख,युसुफ शेख,वसिम शाह,अरुण भागवत ,नाजिम शेख,हाशिम अन्सारी, वाजिद मिर्झा,मोहम्मद असलम मलिक,अजीज अन्सारी, जावेद शाह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!