कु. श्रावणी काळकर हिचे वक्तृत्व स्पर्धेत यश.

अमळनेर (प्रतिनिधि) ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी वाङ्ममय मंडळ ,अमळनेर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कुमारी श्रावणी शैलेश काळकर हिने द्वितीय क्रमांक मिळवला .दिनांक 20 ऑगस्ट रोजी झालेल्या स्पर्धेत तालुक्यातील साठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात”वैभवशाली अमळनेर” या विषयावर तिने आपले वक्तृत्व सादर केले .यात तिला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे ,यासाठी तिला तिचे वडील श्री शैलेश काळकर यांचे मार्गदर्शन लाभले.