केदारनाथला एवढ्या लांब जाण्यास परवडत नाही, तर या अमळनेरला दर्शनाला..! -कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळ जशी चा तशि प्रतिकृती उभारणार..

अमळनेर (प्रतिनिधि) कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळाची बैठक सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मंडळाच्या अध्यक्षपदी सतीश काशिनाथ वाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
केदारनाथच्या दर्शनाला जाणाऱ्या अनेक भाविकांना नैसर्गिक अडचणींमुळे अडचणी तसेच मृत्यूला सामोरे जावे लागते. तसेच सामान्य शेतकऱ्याला एव्हढ्या लांब जाणे परवडत नाही. म्हणून भाविकांची इच्छा कोणतीही अडचण किंवा संकट न येता पूर्ण व्हावी म्हणून सभापती अशोक पाटील व मंडळाने यावर्षी केदारनाथ ची जशी च्या तशी प्रतिकृती उभारून संपूर्ण अमळनेर तालुक्यातील भाविकांना दर्शनासाठी आणण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाने यासाठी जोरदार तयारी केली आहे.
कार्यकारिणीत उपाध्यक्ष गौरव पाटील , उपाध्यक्ष यतीन कोठारी , सचिव प्रकाश अमृतकार ,खजिनदार योगेश महाजन , सदस्य वृषभ पारख , शंकर बितराई ,महावीर बाफना , जितेंद्र राणे , योगेश वाणी , हर्ष बोथरा , गणेश वाणी ,चुडामन शेटे ,अमरदीप अमृतकार ,अमोल मराठे , रोनक पारख , निशांत पारख , मितेश गोसलिया ,महेश झंवर , महावीर सांडेचा ,विनोद अग्रवाल ,सुधाकर पाटील ,कपिल दलाल यांचा समावेश आहे.