पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू. – भगवा चौक परिसरात शोकाकुल.
– एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र रामेश्वर येथील घटना.

एरंडोल ( कुंदन सिंह ठाकुर) एरंडोल येथील रामेश्वर येथे कावड यात्रेला गेलेले तीन युवक सागर अनिल शिंपी (25), अक्षय प्रवीण शिंपी (21), पियुष रवींद्र शिंपी (20) हे तापी नदीच्या संगमावर पोहायला गेलेले असता पाण्यात बुडवून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज म्हणजेच पहिल्या श्रावण सोमवारी 21 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी तीन साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. हे तिघे युवक एरंडोल येथील भगवा चौक या परिसरातील रहिवाशी असून त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचे वृत्त समजतात तिन्ही शिंपी परिवारात कुटुंबातील सदस्यांनी व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला परिसरातील दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद केली. जवळपास सात आठ वर्षापासून एरंडोल येथून रामेश्वरला कावळ यात्रा नेली जात होती. दुर्दैवाची बाब अशी की तिघे मृत तरुण हे अविवाहित आहेत.