बोहरा येथील २७ वर्षीय विधवा महिला बेपत्ता.

अमळनेर(प्रतिनिधि) तालुक्यातील बोहरा येथील २७ वर्षीय विधवा महिला बेपत्ता झाली असून मारवड पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बोहरा येथील २७ वर्षीय महिलेच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले होते. दिनांक १९ रोजी सकाळी ६ वाजता सदर महिलेचे मुल रडायला लागली तेव्हा दिराने घरात जावून पाहिले असता ती घरात नसल्याचे दिसून आले. नातेवाईकांकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने महिलेच्या दिराने दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पो ना सुनील तेली करीत आहेत.