भुजबळांना धमकीचा फोन.

24 प्राईम न्यूज 22 Aug 2023 ब्राह्मण समाज व देवतांच्या बदल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भुजबळांना धमकीचा फोन आला आहे. अज्ञाताने फोन करून तुम्हाला जीवे मारूनटाकू, अशी धमकी दिल्याचे सांगण्या आले. त्यामुळे एकच,खळबळ उडाली वादग्रस्त विधानामुळे चर्चेत गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ हे त्यांच्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत आहेत. त्यांनी नुकतेच नाशिक येथील कार्यक्रमात ब्राह्मण समाजावर व्यक्तीश: टीका केली. भुजबळ म्हणाले होते की, ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची संभाजी आणि शिवाजी अशी नावं ठेवत नाहीत. काही लोकांना सरस्वती तर काही लोकांना शारदा आवडते. परंतू महात्मा ज्योतिबा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली. आम्ही कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही, असे ते म्हणाले होते..