९४ हजार ५०० रुपये किमतीचे ६३ पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

अमळनेर( प्रतिनिधि)तालुक्यातील जळोद शिवारातून जलजीवन मिशन च्या पाणी पुरवठा योजनेचे ९४ हजार ५०० रुपये किमतीचे ६३ पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २० रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली.
अनिल रमेश पाटील रा पटवारी कॉलनी अमळनेर आणि शरद परशुराम पाटील रा पारोळा यांनी दोघांनी फेब्रुवारी महिन्यात पिळोदा येथील पाणी पुरवठा योजनेचे काम घेतले असून जळोद येथून तापी नदीवरून १० किमी वरून पाणी आणण्यासाठी खोदकाम सुरू होते. मात्र पावसाळा सुरू झाल्याने जुलै महिन्यात काम बंद करण्यात आले. म्हणून अमळगाव जळोद रस्त्यावर संजय चौधरी यांच्या शेतात पाईप ठेवण्यात आले होते. आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सरदार किरता पावरा याला सांगितले होते. २० रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास शेताबाहेर रस्त्यावर एका ट्रक मध्ये काही जण पाईप भरत असताना सरदार ला जाग आली. त्याने बॅटरी चा प्रकाश टाकताच ट्रक चालक पाईप घेऊन पळून गेले. अनिल रमेश बोरसे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.
तसेच पैलाड येथील संकेत कैलास पाटील यांची मोटरसायकल क्रमांक एम एच १९ dj ३२३९ ही त्यांचं भाऊ कार्तिक याने गांधलीपुरा भागात एक दुकानजवल लावली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाययक उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.