ऐश्वर्या मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर ! -भाजपचे विजयकुमार गावित यांचे वादग्रस्त विधान.

24 प्राईम न्यूज 22 Aug 2023
डॉ. विजयकुमार गावित यांनी हे विधान केले. “मासे खाल्ल्यामुळे डोळे सुंदर होतात. ऐश्वर्या रायही मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहे. मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात. तुम्हीही मासे खाऊन डोळे सुंदर करा. म्हणजे जिला पटवायचे तिला पटवता येईल,” असे विधान विजयकुमार गावित यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणाले विजयकुमार गावित ?
उपस्थितांना माशांच्या सेवनाचे फायदे सांगताना विजयकुमार गावित यांनी थेट अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. “तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? त्यांनी काही सांगितलं की नाही ऐश्वर्या रॉयबद्दल? ती समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे ? तसे तुमचेही डोळे होणार. हाही एक फायदा आहे”, असे विजयकमार गावित यावेळी म्हणाले.