क्रीडा अधिकारी कार्यालयाने संघटनेच्या नावे लाखो रुपयाचे अनुदान लाटले..
– संघटनांना एक पायी दिला नाही
– अनुदान व आगाऊ रक्कम मिळाले शिवाय स्पर्धा घेणार नाही – क्रीडा संघटनांचा ठराव

जळगाव( प्रतिनिधी)
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद जळगाव यांच्या माध्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनाच्या सचिवांची व प्रतिनिधींची सभा जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित केली होती.
लाखो रुपयांचा भ्रष्टाचार – बरडे
या सभेत कबड्डी संघटनेचे सचिव तथा नगरसेवक नितीन बरडे यांनी माहिती अधि
कारात प्राप्त माहिती अनुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने मागील चार वर्षात प्रत्येक खेळाचे मिळणारे शासकीय अनुदान लाखो रुपयांनी घेतले असून तो पैसा जिल्हा संघटनेला दिल्याचे कागदोपत्री दाखवले म्हणून त्यांनी भर सभेत जिल्हा क्रीडा अधिकारी यांना जाब विचारला तसेच क्रीडा संघटनांच्या प्रतीनिधीला विचारले की आपणास खर्च केल्याची रक्कम मिळाली का? यावर सर्वांनी नाही उत्तर दिले असता त्यावर क्रीडा अधिकारी यांनी मी नवीनच आलेलो आहे चौकशी करून सांगतो असे उत्तर दिले.

शिक्षक व संघटने ची अवेहलना थांबवा – जाधव.
अथलेटिक्स संघटनेचे सचिव राजेश जाधव यांनी क्रीडा कार्यालय क्रीडा शिक्षकांचा व क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधीचा कशाप्रकारे अवमान करते, तसेच खेळाडूंना क्रीडा संकुलातील सोयी सवलती उपलब्ध करून देत नाही, महानगरपालिका स्पर्धांना सहकार्य करीत नाही, संघटनांना त्यांचे हक्काचे काम केल्याचे पैसे देत नाही अशा प्रकारची सविस्तर तक्रार सादर केली
अनुदान व आगाऊ रक्कम द्या – फारुक शेख
फुटबॉल व हॉकी संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी सभेसमोर प्रस्ताव मांडला की पुढील आठवड्या पासून सुरू होणाऱ्या शालेय स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने संघटनाना ५० टक्के आगाऊ रक्कम द्यावी व मागील अनुदान जे संघटनेच्या नावे दाखविले ते देण्यात यावे तेव्हाच स्पर्धा घेण्यात येतील या ठरावाला सर्व संमतीने मान्यता देण्यात आली.
शेख यांनी खंत सुद्धा व्यक्त केली की सभा घेतली जात आहे परंतु क्रीडा संघटक काय बोलत आहे त्याच्या नोंदी कोणीही करीत नाही तर इतिवृत्त कसे लीहले जाईल. फक्त हजेरी पत्रकावर स्वाक्षऱ्या घेतल्या गेल्या आहे त्या सह्यांचा दुरुपयोग तर होणार नाही असे नमूद केले तसेच १२ वाजेची मीटिंग असताना सुद्धा क्रीडा अधिकारी कार्यालयातील एकही अधिकारी १२.१५ वाजेपर्यंत उपस्थित नसल्याची खंत सुद्धा शेख यांनी व्यक्त केली.
संघटनांनी बँक डिटेल द्यावी – तळवलकर
सॉफ्टबॉलचे सचिव डॉक्टर प्रदीप तळवलकर यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे त्वरित आपापल्या संघटनेचे बँक डिटेल द्यावे जेणे करून क्रीडा कार्यालय संघटनेला २-३ दिवसात पैसे ट्रान्स्फर करेल तसेच विभागीय क्रीडा संकुलसाठी संघटनांनी आपआपल्या क्रीडांगणाची तांत्रिक माहिती त्वरित द्यावी व सभेत नितीन बरडे, राजेश जाधव, फारुख शेख, जयांशु पोळ, कोल्हे यांनी मांडलेल्या सूचनाबाबत माननीय जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह तक्रार करण्यात येईल असे सूचित केले.
क्रीडा संघटनाचे अनुदान देऊ
तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी क्रीडा संघटनाच्या पदाधिकारी यांचा रोष मान्य करीत अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ व क्रीडा संघटनांना कार्यालयामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल संघटनांनी सुद्धा क्रीडा कार्यालयात सहकार्य करावे अशी विनंती केली.
क्रीडा कार्यालयास सहकार्य करा – चौहान
क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी मागील अनुदाना बाबत ची चौकशी करतो, यावर्षी होणाऱ्या स्पर्धांना संघटनांना त्वरित अनुदान दिले जातील अशी व्यवस्था करतो, संघटनांनी स्पर्धा घेण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली.
५२ खेळाचे क्रीडा संघटकांची होती उपस्थिती.
२०२३-२४ च्या या सभेत जिल्ह्यातील सुमारे ५२ क्रीडा प्रकारातील क्रीडा संघटक यांची उपस्थिती होती त्यात प्रामुख्याने शिवछत्रपती पुरस्कार अशोक चौधरी, डॉक्टर प्रदीप तडवलकर, फारुक शेख, राजेश जाधव, नितीन बरडे, दिलीप गवळी, इकबाल मिर्झा, अशोक कोल्हे, दीपक आरडे, प्रदीप साखरे, सौ अनिता पाटील, प्रवीण पाटील, जितेंद्र शिंदे, आसिफ आफताब, जयंशू पोळ, आदींची उपस्थिती होती.
गौरव
सर्वप्रथम
तसेच जळगाव येथे नव्याने रुजू झालेले राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले.