काल होती कावड यात्रा आज निघाली अंतयात्रा………!

कुंदन सिंह ठाकुर (एरंडोल)
रामेश्वर संगमावर पियुश शिंपी, अक्षय शिंपी व सागर शिंपी यांचा तोल गेल्याने ते नदीच्या वाहत्या प्रवाहात वाहुन गेले. त्यात त्यांचा दुर्देवी अंत झाला होता…..
आज दिनांक 22 /8 /2023 रोजी त्यांच्यावर अत्यंत शोकांकुल वातावरणात कासोदा रोड स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.परवा गेलेले कावड यात्रा आज निघालेली अंत्ययात्रा अतिशय अस्वस्थ करणारी होती. एकाच कुटुंबातील व एकाच परिसरातील त्यांचे पार्थिव एकाच अंत्ययात्रेत नेण्याची दुर्भाग्य शिंपी परिवारावर दुःखद असे होते..
सोमवारी हसत खेळत सोबत गेलेले आज गावात असे होईल असे कोणाला वाटले नव्हते.
तिघं पार्थिव हे बारा-साडेबारा वाजेला गावात आणण्यात आले व एक वाजेला अंत्ययात्रा काढण्यात आली. अक्षयचे पार्थिव हे अग्रस्थानी तर पियुष चे पार्थिव हे मध्यस्थी व सागर चे पार्थिवे शेवटी. अशा स्वरूपात अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत आमदार चिमणरावजी पाटील तसेच शहरातील राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने श्रद्धांजली साठी एरंडोल बंद आवाहन करण्यात आले होते. त्यास साथ देत शहरातील व्यवसायिकांनी आपली दुकाने दुपारी तीन वाजेपर्यंत बंद ठेवली होती. अक्षय शिंपी,पियुष शिंपी,सागर शिंपी यांच्या परिवाराला आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य दिल्याची माहिती दिली… एरंडोल शहरावर असे अबूतपूर्व दुःख हे नागरिकांचे मन हेलावणारे होते.