उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग, नर्मदा फाउंडेशन येथे घडली घटना. – खंडणीसह जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने १५ जणांविरुद्ध डॉक्टरांने केला गुन्हा दाखल..

अमळनेर( प्रतिनिधि) पोट दुखते म्हणून उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याची घटना दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता नर्मदा फाउंडेशन येथे घडली धानोरा येथील माहेर असलेल्या एका महिलेचे दहा ते बारा दिवसांपासून पोट दुखत असल्याने ती धुळे येथील गणपती पॅलेस समोरील दवाखान्यात गेली होती तेथे सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला अपेंडिक्स सांगितले डॉक्टरांनी शिंदे यांच्या नर्मदा फाउंडेशन मध्ये पाठवले दिनांक 23 रोजी दुपारी साडेतीन वाजता महिला उपचार घेताना डॉक्टरांनी तिचा विनयभंग केला व ती अनुसूचित जमातीची असल्याने तिच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डी वाय एस पी नंदवाडकर करीत आहेत तपासणी साठी घेतलेली फी परत करा १० हजार रुपये द्या नाही तर तुमच्यावर खोटा ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करू असे सांगत दवाखण्याची तोडफोड केल्यावरून दहा ते पंधरा जणांना विरुद्ध दरोड्याचा प्रयत्न व खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्यावरून गुन्हा करण्यात आला आहे नर्मदा फाउंडेशन मधील महिला डॉक्टर हर्षल देवदत्त सदणसंशिव यांनीही फिर्याद दिली आहे त्यात त्यांनी दी २३ रोजी ४ वाजता डॉ अनिल शिंदे क्याबिन मधे रुग्ण तपासणी करत असताना एक महिला पोटात दुखत असल्याने तपासणीसाठी आई सोबत आली मी व डॉक्टर संदीप पाटील असताना डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्यावर त्या महिलेने खोटा आरोप करत दवाखान्या बाहेरील मेडिकल जवळ गुलाब बोरसे नरेश रतिलाल भील रवी वाघ यांच्यासह दीडशे ते दोनशे लोक बोलावून घेतले त्या व्यक्तींनी लोकांसह काहीजण घेतलेली फी परत करा नाहीतर खोटा ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली आणि पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी ड्रॉवर मधील पैसे काढन्याचा प्रयत्न केला महिलेच्या वडिलांनी रागाच्या भरात लोखंडी खुर्ची उचलून ड्रेसिंग टेबलची मोडतोड केली डॉक्टर हर्षल यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला ती महिला तिच्या आई-वडील गुलाब बोरसे नरेश भील रवी वाघ यांच्यासह दहा ते पंधरा लोकांवर दरोड्याचा प्रयत्न आणि खंडणीसाठी जिवें मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भुसारे करीत आहेत