दुचाकीसाठी पसंतीच्या क्रमाकांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

0

24 प्राईम न्यूज 26 Aug 2023 दुचाकी वाहनांच्या क्रमांकाची नवीन नोंदणी एमएच-19/ईएफ – 0001 ते 9999 ची मालिका सुरू करण्यात येणार आहे. नवीन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास 25 ऑगस्ट 2023 पर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत संपर्क साधावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्काचा डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे सादर करावा. वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे. त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे. सदर आकर्षक क्रमांकाचे पावती प्राप्त झाल्यावर सदर पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करणेकामी देणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी. पावतीची विधीग्राह्यता ही फक्त 30 दिवस नोंद घेण्यात यावी. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास क्रमांकाच्या बाबतीत 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा धनाकर्ष/धनादेश स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक बहाल करण्यात येईल. उर्वरित अर्जदारास त्यांचे धनादेश परत करण्यात येतील. असे ही श्री.लोही यांनी कळविले आहे.

0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!