रावेर येथे कांताई नेत्रालयाच्या वतीने ५५ रुग्णांची तपासणी तर १५ रुग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

0

रावेर ( प्रतिनीधी )दि.२८ रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज दिनांक २८ ऑगस्ट सोमवार रोजी कांताई नेत्रालयाच्या वतीने ५५ रुग्णांची तपासणी करून १५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.
यावेळी कांताई नेत्रालयाचे कॅम मॅनेजर युवराज देसरडा यांनी शिबिरार्थी यांना मार्गदर्शन करून माहिती दिली .कांताई नेत्रालयाचे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात नेत्र चिकित्सक डॉ. जकीर शेख व सहकारी विनोद पाटील यांनी ५५ शिबिरार्थी तपासणी करून त्यापैकी १५ रुग्ण मोतूबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज जळगाव येथे कांताई नेत्रालय हॉस्पिटलला पाठविण्यात आले. कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला म.गांधी रिसर्च फाउंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी प्रशात पाटील,प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार देवलाल पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव संतोष तायडे,लिपिक सिद्धार्थ वाघ,खान्देश माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ महाजन, भारतीय बौद्ध महासभेचे रावेर तालुका अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांच्यासह शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!