सचिन ऑनलाईन गेमिंग जाहिरातीमुळे वादात फसला, -आमदार बच्चु कडूनी बजावली कायदेशीर नोटीस..

24 प्राईम न्यूज 29 Aug 2023 माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस बजावणार असल्याची घोषणा एक्स द्वारे केली आहे. सचिन तेंडुलकरने केलेल्या ऑनलाईन गेमिंग अॅपच्या जाहिरातीमुळे तेंडुलकर या वादात फसला आहे. याआधी देखील बच्चू कडू यांनी तेंडुलकरला कायदेशीर नोटीस बजावली होती. बच्चू कडू म्हणतात की, सचिन तेंडुलकर एक भारतरत्न आहे. त्यांनी अशा जुगार खेळाच्या जाहिराती करू नयेत.सचिन तेंडुलकरला याआधी देखील उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तेव्हा सचिनला पेटीएमच्या पहिल्याच जाहिरातीतून माघार घेण्यास सांगण्यात आले होते. या प्रकरणात सचिनकडून कोणताही प्रतिसाद देण्यात न आल्यामुळे नाइलाजाने कायदेशीर नोटीस आम्हाला बजावणे भाग पडले आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. त्यांनी पेटीएमसारख्या जाहिरातीत सहभागी होणे शोभत नाही, अशी टिप्पणीही कडू यांनी केली आहे.