शरद पवारावर केलेल्या भुजबळांच्या वक्तव्यावरून तीव्र पडसाद उमटत आहे..

24 प्राईम न्यूज 29 Aug 2023 राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद उमटत आहेत
बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. “साहेब म्हणतात माझी चूक झाली, माफी मागतो. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागाची असेल, तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल” असे म्हणत टीका केली होती. त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहे बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांकडून भुजबळ यांची गदार अशी संभावना करत पुतळ्याची होळी केली जात आहे