फडणवीसांचे ज्ञान इतके तोकडे वाटले नव्हते – उद्धव

24 प्राईम न्यूज 5 Sep 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ज्ञान इतके तोकडे असेल असे मला वाटले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मंजूर नसेल तर त्याबाबतचा वटहुकूम काढण्याचे अधिकार केवळ संसदेलाच आहे. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वटहुकूम काढण्याचा अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी अभ्यासू समजत होतो, पण ते तर मंत्रालयाच्या आजूबाजूला देखील फिरण्याच्या कुवतीचे नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. लाठीमारप्रकरणी एक फुल दोन हाफ म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा मराठा आरक्षण रद्द झाले त्यानंतर एक वर्ष उद्धव ठाकरेत्यांनी का वटहुकूम काढला नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, फडणवीसांचे ज्ञान इतके तोकडे असेल असे मला वाटले नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलायचा असेल तर वटहुकूम काढण्याचा अधिकार संसदेला आहे.