सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकेल असेच आरक्षण मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार..

24 प्राईम न्यूज 5 सेप 2023 जालना येथे झालेली लाठीमाराची घटना दुर्दैवी आहे. संबंधित एसपी दोषी यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठविण्यात आले असून त्यांच्या जागी नवीन पोलीस अधीक्षक बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक सखोल चौकशी करत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सरकार प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या पाठीशीच आहे. मराठा समाजाला अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकेल असेच आरक्षण मिळावे यासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले. मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीनेतातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम
अहवाल द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.