आजारपणाने बाहेर पडलो नव्हतो त्यातून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न झाला. -अजित पवार

24 प्राईम न्यूज 5 Sep 2023
दोन दिवस मी आजारी असल्याने बाहेर पडलो नव्हतो. त्यातून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न झाला. राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरक्षण देत असताना कायद्याच्या चौकटीत ते बसले पाहिजे. न्यायालयात ते टिकले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात
अडचण येता कामा नये. फडणवीस राज्याचे प्रमुख असताना त्यांनी घेतलेला आरक्षणाचा निर्णय टिकला. सर्वोच्च न्यायालयात नंतर तो नाकारण्यात आला. आज आम्ही सर्व शक्यतांवर चर्चा केली. सध्या बंद सुरू, एसटीची जाळपोळ हे राज्याचेच नुकसान आहे. दहा कोटींच्या एसटी जाळण्यात आल्या. हे राज्याचे नुकसान आहे. आधी जे मोर्चे निघाले ते शांततापूर्ण निघाले. त्याचे सगळीकडे कौतुक झाले. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. मंत्री गिरीश महाजन हे अंतरवाली सकटी येथे जाऊन शासनाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. मंत्रालयातून लाठीमाराचा आदेश आल्याचे सिद्ध करून दाखवा. आम्ही सांगाल ते ऐकण्यास तयार आहोत. असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाने शांतता पाळावी, असे आवाहन केले.