भाजपचे डॉ. बी. एस. पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

अमळनेर ( प्रतिनिधि ) खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश; तर राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदीही झाली निवडजळगाव जिल्ह्यात तब्बल तीन वेळा आमदारकी भूषविणारा भाजप नेता बी.एस. पाटील आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगावात आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.
जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर शरद पवार आज आलेले आहेत. त्यांची जळगावात आज सभा सुरु झालेली होती. यावेळी शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते बी. एस. पाटील यांचा पक्ष सोहळा संपन्न झाला.