न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पाच सप्टेंबर शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात संपन्न..

एरंडोल ( प्रतिनिधि) एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये 5 सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तेच औचित्य साधून न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 5 सप्टेंबर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात

आला याप्रसंगी प्रथम शाळेच्या प्रिन्सिपल सरला विंचुरकर व्हाईस प्रिन्सिपल सरिता पाटील यांनी माता सरस्वती व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची भूमिका इयत्ता चौथीचा गौरांश उपाध्याय व इयत्ता दुसरीचा प्रणव जाजू या विद्यार्थ्यांनी केली व कार्यक्रमाला सुरुवात केली शाळेच्या कामकाजातील पहिले चार तास विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका केल्या नर्सरी ते दहावीपर्यंत सर्व शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका वर्ग नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी पार पाडल्या यात मुख्य प्रिन्सिपल ची भूमिका राजेश्वरी जोगी वाईस प्रिन्सिपल ची भूमिका चैताली पाटील या विद्यार्थिनींनी केली कार्यक्रमाप्रसंगी शिक्षकांच्या भूमिका केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांबद्दल चे आपला आदर व शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले तसेच वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले तर शिक्षकाच्या आदर म्हणून एका गाण्यावर नृत्य ही सादर केले तर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी काबरे सर, सचिव श्रीकांतजी काबरे सर सहसचिव सागरजी मानूधने सर शाळेचे चेअरमन सिद्धेशजी महाजन सर व सर्व संचालक मंडळ यांनीही शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला व शिक्षकाच्या भूमिका करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला या कार्यक्रमाचे तयारी सांस्कृतिक विभाग शिक्षक कविता पाटील व आरती भेलसेकर यांनी केले तर सूत्रसंचालन आरती भेलसेकर व आभार कविता पाटील यांनी केले याप्रसंगी शाळेच्या प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते..