शालेय हॉकी स्पर्धा गोदावरी स्कूल ला दुहेरी मुकुट व एम आय तेली विजयी.

जळगाव ( प्रतिनिधी) आंतर शालेय हॉकी स्पर्धा १४ वर्षे गटात मनपा स्तरीय स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम विरुद्ध अँग्लो उर्दू ने १-० ने विजय मिळवत सुवर्णपदक पटकाविले तर मुलींमध्ये सुद्धा गोदा
वरी इंग्लिश मीडियम स्कूल ने पोतदार इंग्लिश मीडियम स्कूलचा १-० ने पराभव करीत सुवर्णपदक मिळवले अशाप्रकारे मनपा हॉकी स्पर्धेत गोदावरीने दुहेरी मुकुट संपादन केले.
जिल्हास्तरीय स्पर्धा
जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत अंतिम सामना बियाणी मिलिटरी स्कूल विरुद्ध एमआय तेली यांच्या खेळला गेला त्यात एमआय तेली संघाने बियानीं संघाचा ३-० ने पराभव करत मुलांच्या गटात सुवर्णपदक तर मुलींच्या गटात सेंट मेरी स्कूल, अमळनेर यांनी स्वर्ण पदक पटकाविले.
पारितोषिक वितरण समारंभ
मनपा व उर्वरित गटातील विजयी व उप विजयी संघांना हॉकी जळगाव व स्पोर्ट्स हाऊस तर्फे पदके देण्यात आली.
शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान, नगरसेवक रियाज बागवान, हॉकी जळगाव चे सचिव फारूक शेख ,स्पोर्ट्स हाऊस चे संचालक आमीर शेख,क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात, क्रीडा संचालक आसिफ शेख, मुस्लिम सेवा संघ चे सलीम रणवावाले, हमीदा बानो, क्रीडा शिक्षक राहील अहमद,राष्ट्रीय खेळाडू अरबाज खान यांच्या हस्ते खेळाडूंना पदक देण्यात आले.

स्पर्धेचा अंतिम निकाल
मनपास्तर- मुले
१)अंगलो उर्दू हायस्कूल वी वी पोद्दार हायस्कूल २-०
२) गोदावरी हायस्कूल वी वी अँग्लो उर्दू १-०
मुली
१) गोदावरी वी वी पोद्दार हायस्कूल १-०
जिल्हास्तरीय – मुले
१) बियाणी मिलट्री वी वी डॉक्टर उल्हास पाटील भुसावळ २-०
२) एम आय तेली, भुसावळ विवि सेंट मेरी अमळनेर २-०
३)डॉक्टर उल्हास पाटील भुसावळ वी वी सेंट मेरी अमळनेर १-०
४) एम आय तेली भुसावळ विवि बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ २-०
फोटो
१) जिल्लाह स्त