जरांगे-पाटलांचे प्राण कसे वाचवायचे या प्रश्नाभोवती जालना जिल्ह्याची यंत्रणा गतिमान.

24 प्राईम न्यूज 8 Sep 2023 मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामकाळाप्रमाणे कुणबी जात प्रवर्गात सरसकट समाविष्ट करावे आणि ते करताना “वंशावळी”चा निकष बासनात गुंडाळावा या मागणीपासून मनोज जरांगे पाटील तसूभरही हलणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने उपोषणावर ठाम असलेल्या जरांगे-पाटलांचे प्राण कसे वाचवायचे या प्रश्नाभोवती जालना जिल्ह्याची यंत्रणा गतिमान झाली आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून शिंदे फडणवीस – अजित पवार सरकारला विरोधी पक्षांचे
सर्वच नेते, मराठा समाज यांना चांगलेच कोंडीत पकडले असले तरी टार्गेट मात्र देवेंद्र फडणवीसांना केल्याचे दिसून येत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही निर्णय अंगलट येणार असल्याने “सरसकट सर्वांना” आणि “वंशावळीचा मुद्दा वगळणे” शक्य नसल्याने खालावत चाललेली जरांगे-पाटील यांची प्रकृती आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी शासन दरबारी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. यासर्व परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील नेते देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय बळी देणार, की दिल्लीतील नेत्यांच्या आशीर्वादाने फडणवीस आता कोणाचा राजकीय बळी घेणार, याचीच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.