अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचे जोरदार पुनरागमन.

अमळनेर ( प्रतिनिधि) संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवडयात पावसाची पुन्हा एकदा एण्ट्री झाली. गुरुवारी सकाळपासून पावसाने अमळनेर सह परिसरात जोरदार सुरुवात केली. दहीहंडी उत्सव, त्यात पावसाची हजेरी यामुळे गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला, तर गरमीमुळे हैराण झालेला अमळनेरकर काहीसा सुखावला. गुरुवारी सकाळ पासून दरम्यान, गुरुवारी बरसलेल्या पावसाचा जोर शुक्रवारी कायम असेल, तर पुढील एक आठवडा पावसाच्या
सरी बरसण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभाने व्यक्त केला आहे यंदा संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलैच्या १५ दिवसांत वरुणराजाची समाधानकारक एन्ट्री झाली, मात्र ऑगस्टमध्ये पावसाने महिनाभर दडी मारलेला पाऊस विविध भागात पावसा साठी सामूहिक नमाजाचे आयोजन करण्यात आले होते तसेच दहीहंडीच्या मुहूर्तावर विविध भागात पावसाने जोरदार सलामी दिली. त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने शेतकऱ्या मधे समाधानाचे वातावरण आहे.