ऑनलाईन गेमिंग : महसुलात ५० हजार कोटी जमा होणार

24 प्राईम न्यूज 8 Sep 2023
नवी दिल्ली: नवीन २८ टक्के जीएसटी कर नियम लागू झाल्याने एकीकडे ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांना मोठा फटका बसणार असला तरी सरकारी तिजोरीत मोठी भर पडणार आहे. ऑनलाईन गेमिंगवरील अप्रत्यक्ष कराचे दर वाढवून सरकारला अतिरिक्त ४५-५० हजार कोटी रुपये मिळण्याचा अंदाज बांधला जात आहे. जीएसटी कौन्सिलने नुकत्याच झालेल्या ५० व्या बैठकीत ऑनलाईन गेम, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवरील कर दर बदलण्याचा निर्णय घेतला होता. ऑनलाईन गेमिंग कंपन्या आणि कॅसिनोद्वारे कर मोजण्यासाठी सरकारने जीएसटी कायद्यात सुधारणा अधिसूचित करत अर्थ मंत्रालयाने बुधवारी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.