‘भारत’ नावावरून भाजपची पुन्हा गोची..

24 प्राईम न्यूज 8 Sep 2023
इंडिया’ या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या नावाने हैराण करून सुटलेल्या भाजपने संविधानातूनच या नावाचं उच्चाटन करून भारत नावाचा वापर करायचा पवित्रा घेताच आघाडीनेही ‘इंडिया’ ला पर्यायी’ भारत’ नाव देण्याची तयारी सुरू करत भाजपपुढे संकट उभं केलं आहे. ‘इंडिया’ नावाची आखणी ज्यांनी केली त्या शशी थरूर यांनीच ‘भारत’ नावाची जुळणी करत भाजपला कोंडीत पकडलं आहे.भारतीय राज्यघटनेत इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे असताना सध्या भारत ( Bharat ) की इंडिया (India) या नावावरून चर्चा रंगली आहे. विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया (I.N.D.I.A) आघाडीला शह देण्यासाठी भाजपच्या नेतृत्त्वातील सरकारने भारत हे नाव पुढे केला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी आता भारत (BHARAT) हे आद्याक्षर वापरून विरोधकांच्या आघाडीचे नाव सुचवले आहे. शशी थरूर यांनी ‘एक्स’वर (आधीचे ट्रीटरवर) पोस्ट म्हटले की, आम्ही आमच्या आघाडीला अलायन्स फॉर बेटरमेंट, हार्मोनी अँड रिस्पॉन्सिबल अॅडव्हान्समेंट फॉर टुमारो (Betterment, Harmony And Responsible Advancement for Tomorrow (BHARAT) 7) असे म्हणू शकतो. मग सत्ताधारी पक्ष नावे बदलण्याचा हा खेळ थांबवतील असे थरूर यांनी म्हटले. याआधीदेखील भारत की इंडिया या वादावर थरुर यांनी आपले मत व्यक्त केले होते.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी -२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ९ सप्टेंबर रोजी रात्र भोजनाचे आयोजन केले आहे. या आमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर हा देशाच्या नामांतराचा घाट आहे का अशी पहिली शंका काँग्रेसने घेतली. त्यानंतर इतर राजकीय पक्षांनी, विचारवंतांनी, खेळाडूंपासून कलाकार, सामान्य नागरीक अशा विविध घटकांनी देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.
भारतीय राज्यघटनेत India that is Bharat… shall be union of states. असं नमूद करण्यात आले आहे. याचाच अर्थ इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावे अधिकृत आहेत. तर, इंडियाऐवजी भारत असा उल्लेख व्हावा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जुनी मागणी आहे.