अमळनेर शहरातील बारा भाई उर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्ट ची नविन कार्यकारणी जाहिर.

अमळनेर ( प्रतिनिधि ) शहरातील बारा भाई उर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्ट ची नुतन कार्यकरणी नुकतेच संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पठाण मुश्ताक खान यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली तसेच दिनांक ८ सप्टेंबर २०२३ शुक्रवार रोजी बारा भाई उर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्टीची बैठकीत खालीलप्रमाणे निवड करण्यात आली त्यात अध्यक्षपदासाठी मोहम्मद इक्बाल इस्माईल शेख, उपाध्यक्ष आरीफ हाजी सत्तार मेमन, सचिव अफसरखा गुलाबखा पठाण तर सदस्य म्हणून शेख जमील शफीयोदीन, शेख अशफाक बशीरोदीन, शेख रियाजुद्दीन हाजी कुतुबुद्दीन , शेख मुजाहिद अब्दुल हमीद , यांची निवड करण्यात आली सर्व नवनिर्वाचित चे इलाही गृप अंदरपुरा मोहल्लातील युवक व वरीष्ठानकडून अभिनंदन करण्यात आले