एरंडोल येथील निवृत्त सेवा संघाची वार्षिक सभा पंचायत समिती एरंडोल च्या सभागृहात संपन्न..

एरंडोल( कुंदन ठाकुर)एरंडोल येथील निवृत्त सेवा संघाची वार्षिक सभा पंचायत समिती एरंडोल च्या सभागृहात संपन्न झाली.तत प्रसंगी ची छायाचित्रे अध्यक्षस्थानी माननीय सदाभाऊ सोनवणे, जिल्हा निवृत्त सेवा संघाचे अध्यक्ष. सन्माननीय श्री. देवेंद्रजी साळी कीझेकीस्थानचे व मॉरिशस चे भारत सरकारचे राजकीय राजदूत यांना शाल श्रीफळ गुलाबबुके देऊन सन्मानित करण्यात आले. गत दोन वर्षाच्या अन्नदात्या श्रीमती उषा किरण खैरनार व श्रीमती लीलाताई भोळे यांनाही स्टीलचा ट्रे देऊन गुलाब बुके देऊन सन्मानित करण्यात आले.एरंडोल तालुक्याचे माननीय गट अधिकारी श्री दादाजीराव जाधव यांचे निवृत्त सेवा संघास वेळोवेळी अडचणी सोडवण्यास प्राधान्याने सहकार्य केल्यामुळे त्यांचा यथोचित सत्कार दूतामार्फत करण्यात आला.उपलेखापाल सौ. अर्चनाताई बेलदार यांनाही शान श्रीफळ देऊन प्रतिनिधी मार्फत सन्मानित करण्यात आले व पंचायत समितीतील निवृत्त सेवा संघास सहकार्य करणारे अधीक्षक सुनील बापू महाजन, दिलीप सोनवणे, जयेश वानखेडे ,सौ.मीनाक्षी मोरे ,तडवी बापू यांनाही नॅपकिन व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.तथा श्री.पुंजू व्यंकट देवरे यांनी संघटन संघटनेस मोठ्या मनाने रुपये पाच हजार देणगी दिली व वय वर्ष 86 च्या वर झाल्यामुळे त्यांनाही संघटनेने शाल श्रीफळ बुके देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे अन्नदात्या श्रीमती मंदाकिनी साळी यांनाही शाल श्रीफळ गुलाब बुके देऊन सन्मानित करण्यात आले. अनेक महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा साळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनाही शाल श्रीफळ बुके देऊन सन्मानित करण्यात आले .तथा श्री .पंडित साळी यांना श्री. भगवान जिव्हेश्वर समाचार पुणे तर्फे बारगजे गुरुजी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांनाही सपत्नीक शाल श्रीफळ गुलाब बुके देऊन अध्यक्षांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .श्री. भास्कर कोळी यांना तालुक्याचे उत्तम कार्य केल्याबद्दल स्टीलचा ट्रे देऊन सन्मानित करण्यात आले. आयोजक एरंडोल तालुका निवृत्त सेवा संघाचे अध्यक्ष श्री. पंडित साळी .सचिव श्री. भास्कर कोळी तथा एरंडोल तालुक्यातील निवृत्त सेवा संघाचे , जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष सचिव यांना शाल ऐवजी स्टीलचा ट्रे देऊन सन्मानित करण्यात आले . सदर वार्षिक सभेत बहुसंख्य सभासद बंधू भगिनी उपस्थित होते सदर प्रसंगी श्री. देवेंद्रजी साळी यांनी आपल्या जीवनातील कर्तव्य आणि प्रसंग विशद केलेत.व कोणास मॉरिशसला यायचे असेल तर मी पूर्ण सहकार्य करेल असे सभेस संबोधित केले.तथा निवृत्त सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री सदाभाऊ सोनवणे यांनी निवृत्त सेवा संघाच्या अडचणी, समस्या सोडवणे त्यावर संघटनेचे कार्य, शासनाचे जीआर संदर्भात सविस्तर माहिती दिली व शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे पूर्ण आश्वासन दिले.सभेस यथोचित मार्गदर्शन केले. सदर वार्षिक सभेच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष श्री प्रभाकर पाटील गौतम अडकमओल,कोषाध्यक्ष धनसिंग पाटील कार्यकारणी सदस्य भगवान चव्हाण, शालिनी कोठावदे, रघुनाथ कोठावदे, देवीदास दांडगे , संतोष पाटील ,वीष्णू ठाकरे , नारायण बोरसे ,चंद्रकांत ठाकूर, लायक अली, जहूर जनाब, गफूर जनाब ,इस्माईल जनाब, कमल चौधरी ,शोभा पाटील, दिलीप पाटील ,सागर महाजन, रमेश आबा पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.अध्यक्ष श्री. पंडित साळी यांनी यथोचित अलंकारिक स्वरूपात सूत्रसंचालन केले व रवींद्र लाडगे यांनी आभार प्रदर्शित केले. अथ श्री. एरंडोल तालुक्याचे निवृत्त सेवा संघाची 41वी सभा सोहळा संपन्न झाला.