जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणी साठी जनजागृती मुंबई ते दिल्ली सायकलवारी..

धुळे ( अनिस खाटीक) जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी एक अवलिया जो सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे त्यांचे नाव श्री आर डी निकम असे असून ते मूळचे मालेगाव येथील आहेत, त्यांचे वय ६० वर्षे आहे. त्यांनी मुख्याध्यापक पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे. ते स्वतः पेन्शन धारक असून माझ्या इतर सहकारी बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी ते जनजागृती करत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून ते मुंबईहून सायकलवारीने दिल्ली येथे निघालेले आहेत. त्याचे कारण असे की दिनांक ०१ऑक्टोबर २०२३ रोजी रामलीला मैदान दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनासाठी संपूर्ण देशभरातून एनपीएस धारक येणार आहेत आणि म्हणून जुनी पेन्शन योजनेचा संदेश प्रत्येक गावात, शहरात व राज्यात पोहोचावा यासाठी हा अवलिया सायकलीने मुंबई ते दिल्ली प्रवास करीत आहे. आज त्यांचे धुळे शहरात आगमन झाल्याने त्यांचे जि.प.आवारात स्वागत करण्यात आले यावेळी जूनी पेन्शन मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जि.प.शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे, जि.प. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वनराज पाटील, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे शिलेदार मंगेश राजपूत, अनिल सोनवणे, अनिल बेडसे, प्रविण चौधरी, विजय पाटील, रविंद्र देवरे, भानुदास पाटील, धीरज परदेशी, ज्ञानेश्वर पाटील,भास्कर परदेशी, योगेश पाटील, राजेंद्र पाटील, सुहाग सोनवणे, तुषार महाले, योगेश चव्हाण, दादा खोटे, धनराज पाटील, ज्ञानेश्वर शिरसाठ, भरत पाटील, वसंत पानपाटील, योगेश कोळी, संदीप ठोके, संतोष निकम, सुनील थोरात, आश्विन कुमार, महेश बाविस्कर, नरेंद्र पाटील, उपस्थित होते.