मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर

जळगाव( प्रतिनिधी )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी जळगाव दौऱ्यावर येत असून पाचोरा येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमास उपस्थित राहतील.
मुख्यमंत्री शिंदे यांचे दुपारी बारा वाजता जळगाव विमानतळ येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते पाचोऱ्याकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. पाचोरा येथील एम. एम. कॉलेज मैदान येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.