मुंबईला महाराष्ट्रपासून तोडण्याचे षड्यंत्र. नाना पटोले..

24 प्राईम न्यूज 12 Sep 2023 विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रा पासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील आठवड्यात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाच्या मुद्द्यावरून पटोले यांनी टीका केली. कोरोना संकटावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही, नोटबंदीच्या वेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही, मणिपूरच्या मुद्यावरही विशेष अधिवेशन बोलावले नाही, पण आपल्या लहरी आणि मनमानीपणाने आता विशेष अधिवेशन बोलावले आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे काम मागील ९ वर्षांत अनेकदा झाले. मुंबईला तोडण्याचे मोदी सरकारचे षड्यंत्र आहे, असा आरोप पटोले यांनी केला.