अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बस वून नेऊन विनयभंग

अमळनेर( प्रतिनिधि )अमळनेर तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवर फिरवून विनयभंग करणाऱ्या सारबेट्याच्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
या मुलीला सारबेटा येथील दोनजणांनी ओळखीचा फायदा घेत ९ रोजी सकाळी ११ वाजताचे दरम्यान बसस्थानकावरून दुचाकीवर बसवून तिला फिरविण्याच्या उद्देशाने धार येथील टेकडीवर नेऊन तिचा विनयभंग केला.मुलीच्या फिर्यादीवरून वरील
दोघांविरुद्ध विनयभंग व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करत आहेत.