मानवतावादी व नीतिमत्ता असलेले हाजी गफार मलिक यांना मरणोत्तर जळगाव रत्न पुरस्कार दिल्याबद्दल मुस्लिम समुदायाने मानले महापौरांचे आभार.

जळगाव ( प्रतिनिधी ) जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने जळगाव शहरातील चार महनीय व्यक्तिमत्त्वाला जळगाव रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुस्लिम समाजाचे डॉक्टर अब्दुल गफार मलिक यांचा मरणोत्तर पुरस्कार देऊन
गौरव करण्यात आल्याबद्दल जळगाव शहरातील मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाज बांधवांनी एकत्रित येऊन महापौर जयश्री महाजन यांना लेखी पत्र देऊन त्यांचे आभार मानले.

जळगाव शहरात मुस्लिम समाजाचे अनेक व्यक्तिमत्व असताना सुद्धा महानगरपालिकेने मुस्लिम समाजातील खरा व प्रामाणिक तसेच ज्याची शैक्षणिक पात्रता कमी असली तरी त्याच्या जवळ असलेली नीतिमत्ता, मानवता, राष्ट्रीय एकात्मता, गरिबी जाणणारा, समाजकार्यात आल्यावर आपले इतर उद्योगधंदे बंद करून प्रामाणिक कार्य करणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात स्वकष्टाने कार्यरत असणारे हाजी अब्दुल गफार मलिक यांना मरणोत्तर पुरस्कार दिल्या बद्दल महापौर व म न पा चे खास आभार मानले.
प्रातिनिधिक स्वरूपात महापौर महाजन यांना पत्र व पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.
शिष्ट मंडळात यांचा होता समावेश
जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, कुलजमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मजहर पठाण, राष्ट्रीय काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अमजद पठाण, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अहमद सर, बी वाय एफ चे अध्यक्ष शिबान फैयाज, शिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, ईदगाह ट्रस्टचे सहसचिव अनिस शहा, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, जननायक फाउंडेशनचे आबिद शेख, मरकज फाउंडेशनचे मुजाहिद खान, तांबापूरचे समाजसेवक आसिफ शेख व आसिफ शाह, हुसेनी सेना चे अध्यक्ष फिरोज शेख आदींची उपस्थिती होती.