संजय पवार,चेअरमन जिल्हा बँक. अखेर दिलगिरी व्यक्त करीत मागितली माफी,

अमळनेर (प्रतिनिधि)
आदरणीय स्मिता ताई व स्वर्गिय उदयबापु वाघ यांचेवर प्रेम करणारा सहकारी बंधू परीवार यांना नमस्कार….
दिनाक १० सप्टेंबर रोजी झालेल्या नामदार अनिल दादा पाटील यांच्या नागरी सत्काराप्रसंगी स्वर्गीय उदय बापू यांचे बद्दल माझ्याकडून बोलण्याच्या ओघात चुकीचे बोलले गेले होते वास्तविक स्वर्गिय उदयबापू बद्दल माझ्या मनात कोणताहि वाईट हेतू नव्हता तसेच माझे व स्व. उदयबापू यांचे संबंध खूप स्नेहाचे होते हे स्मिता ताई यांनाही माहीत आहे,
पण तरी माझ्या बोलण्यामुळे ताई व स्व. उदयबापू सहकारी बंधू मित्र परीवार यांच्या भावना दुःखल्या बद्दल व त्रासा बद्दल मी आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करीत आहे
आपला
संजय पवार चेअरमन जिल्हा बँक