शाडू माती पासुन गणेश मूर्ती बनविण्याची कार्य शाळेचे आयोजन.

एरंडोल( कुंदन ठाकुर)एरंडोल नगरपरिषद तर्फे आजदि.१३/०९/२०२३ वार – बुधवार रोजी सकाळी १०.३० वाजता न.पा. सभागृह याठिकाणी मोफत शाडू माती पासून गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केलेली आहे.
सदरील कार्यशाळा जळगावचे मूर्तिकार आर्किटेक्ट शिवम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे.
कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून यासाठी लागणारी शाडू माती देखील नगरपरिषद तर्फे पुरविली जाणार आहे.
सदरील कार्यशाळेसाठी आपल्या शहरातून जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा व येणारा गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी आपला हातभार लावावा.
असे आवाहन विकास नवाळे
मुख्याधिकारी तथा प्रशासक न.पा.एरंडोल यांनी केले आहे.