फरार गोरक्षक मोनू मानेसरला अटक.

24 प्राईम न्यूज 13 Sep 2023 भिवानीमध्ये नसीर जुनेद हत्याकांडात हात असलेला फरार गोरक्षक मोनू मानेसर याला हरियाणा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. नसीर – जुनेद यांना जिवंत जाळण्यात आल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
मोनू गेल्या आठ महिन्यांपासून फरार होता. त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी हरियाणातील भिवानी येथे बोलेरो गाडीत दोन जळालेले मृतदेह सापडले होते. तपासात हे मृतदेह राजस्थानच्या गोपालगड येथील जुनैद आणि नसीर यांचे असल्याचे समोर आले आहे. हरियाणातील अनेक गोरक्षकांवर त्यांच्या हत्येचा आरोप आहे. यातील सर्वात लोकप्रिय नाव मोनू मानेसर उर्फ मोहीत यादवचे होते.