उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट.

24 प्राईम न्यूज 13 Sep 2023 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. सोबत जयंत पाटील आणि संजय राऊत देखील होते. संसदेचे आगामी विशेष अधिवेशन, राज्यात सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन, लोकसभा निवडणुकांचे जागावाटप आदी महत्त्वाच्या मुद्यांवर या भेटीत चर्चा झाली. ही बैठक सुमारे दीड तास सुरू होती. लोकसभा जागावाटप हा दोन पक्षांचा विषय नाही. त्यामुळे आघाडीच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. आघाडीचे नेते जागावाटपाची चर्चा लवकरात लवकर करतील, असे जयंत पाटील यांनी नंतर सांगितले.
सिल्व्हर ओकवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खा. संजय राऊत होते यावेळी उपस्थित होते.