मुस्लीम समाजालाही आरक्षण देण्याची मागणी, -खासदार हुसेन दलवाई

24 प्राईम न्यूज 13 Sep 2023
मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करताना मुस्लीम समाजालाही ५ टक्के आरक्षण देण्याचा सर्वच राजकीय पक्षांनी मिळून निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली. देशात मुस्लीम समाज शिक्षण, नोकरी, उद्योगामध्ये दलित आणि आदिवासी समाजापेक्षाही मागे आहे. ही वस्तुस्थिती सच्चर समितीने लक्षात आणून दिल्याने मुस्लीम समाजालाही ५ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी केली.