लेखी आश्वासन देण्यासह मागण्या शिंदे सरकारसमोर ठेवल्या. जंरांगे- पाटील.

24 प्राईम न्यूज 13 Sep 2023 गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. आपण घातलेल्या अटींची सरकार पूर्तता करत नाही, तोपर्यंत घरी जाणार नाही… आंदोलनस्थळीच बसून राहणार, अशी भूमिका जरांगे-पाटील यांनी मांडली आहे. अटी पुढीप्रमाणे. *समितीचा अहवाल काहीही आला तरीही राज्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे लागणार.
*मराठा आंदोलकांवर जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत तेवढे सगळे गुन्हे मागे घ्यावेत.
*लाठीचार्जमध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांचे तत्काळ निलंबन करावे.
*उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, *सगळे मंत्रिमंडळ तसेच छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले हे उपस्थित पाहिजेत.
*राज्य सरकारकडून हे सगळे आम्हाला लेखी हवे आहे. तसेच वेळेची मर्यादा घालून दिली आहे हे त्यात नमूद असावे. ३० दिवसांचा अल्टिमेटम सरकारला असेल.
*जर या अटी मान्य करायच्या असतील तरच येथे या. अन्यथा येथे येऊच नका, आहात तिथेच थांबा. भाषणबाजी नको.