जळगावचे दोन फुटबॉलपटू राष्ट्रीय स्पर्धा खेळून जळगावी परत..

जळगाव ( प्रतिनिधी )
जळगाव जिल्हा फुटबॉल संघटने मार्फत जिल्ह्यामधून राज्य पातळीवरील निवड चाचणी साठी मुंबई येथे २ मुले व २ मुली अशे चार खेळाडू पाठविले होते.
मुंबई शिबिरातून निवड
मुंबई कुपरेज येथे १५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर मध्ये ४७ मुली मधून व ५५ मुला मधून आपले जळगाव जिल्ह्यातील भुसावळ सेंट् अलायसिस हायस्कूल चा अथर्व दीपक तिवारी व मुलींमध्ये ताप्ती पब्लिक स्कूलची संस्कृती मनोज मेढे या दोघांची निवड महाराष्ट्र राज्याच्या संघात झाली होती.
राष्ट्रीय स्पर्धेत सहभागहून परत
दोघी खेळाडू हे राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा १४ वर्षातील गटात खेळून आज जळगावी परत आले असता त्या दोघी खेळाडूंचा जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन तर्फे ट्रॅक सूट व पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे सचिव फारूक शेख व सहसचिव तथा मुख्य प्रशिक्षक अब्दुल मोहसीन यांनी त्यांचा गौरव केला.
राष्ट्रीय स्पर्धा कोलकत्ता व पंजाब येथे
१४ वर्षातील गटातील मुलांच्या स्पर्धा ३ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २३ ला कोलकाता येथे तर मुलींच्या स्पर्धा याच दरम्यान पंजाब येथे खेळल्या गेल्या यात
महाराष्ट्र मुलींच्या संघाने वेस्ट बंगालची २-१, अरुणाचल प्रदेश २-०, व हरियाणा सोबत २-२ ची बरोबरी राखली .
महाराष्ट्र मुलांच्या संघाने मिझोराम सोबत ९-० ने पराभव स्वीकारला, ओरिसाने १-० शून्याने पराभव केला तर महाराष्ट्राच्या संघाने केरला सोबत दोन-दोन ची बरोबरी केली.
संघटने मुख्य आश्रय दाते अशोक जैन, अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील व संपूर्ण कार्यकारिणी ने या दोघा
राष्ट्रीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे..